Breaking News

होळी, धुलिवंदन व रंगपंचमी साधेपणाने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Satara  District Collector orders to celebrate Holi, Dhulivandan and Rangpanchami with simplicity

        सातारा दि.25 (जिमाका): कोरोनाचा प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता होळी, धुलिवंदन व रंगपंचमी हे उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 11973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारानुसार  जारी केले आहेत. 

यावर्षी दि. 28 मार्च रोजी होळी, 29 मार्च रोजी धुलिवंदन व दि. 2 एप्रिल रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहे. होळी-शिमगा हा सण कोणत्याही प्रकारे गर्दी न करता साधेपणाने साजरा करावा. या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. 

होळी-शिमगा निमित्ताने खास करुन सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू या वर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल अशी उपाययोजना करावी. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देणे. होळी व धुलिवंदन हे उत्सव सार्वजनिक ठिकाणी व सार्वजनिक स्वरुपात आयोजित करु नये. तसेच इतर कोणतेही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. या आदेशापेक्षा कडक निर्बंध स्थानिक प्रशासनांनी यापूर्वी लादले असतील तर ते लागू राहतील अथवा यानंतर देखील कडक निर्बंध लादू शकतील. या आदेशानंतर काही नवीन सूचना  प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील. 

या आदेशाची संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भातीय साथरोग अधिनियम 1897 व भातीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई केली जाईल असेही आदेशात नमुद केले आहे.  

No comments