Breaking News

फलटणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड

Selection of 15 engineering college students for jobs in various companies

         फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटणच्या १४ विद्यार्थी/विद्यार्थीनींची विविध मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी साठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांनी दिली आहे. 

      टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीमध्ये सौरभ कुतवळ, विद्यापीठ टेबल टेनिस खेळाडू सानिया देशपांडे,व ऐश्वर्या गांधी, तेजस्वी सस्ते, तेजस्वी पवार, संजिता गुंजवटे, शिवांजली तेली या विद्यार्थ्यांची निवड झाली या सर्व विद्यार्थ्यांना ३.३६ लक्ष एवढे वार्षिक वेतन मिळाले. ॲक्सेंचर या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये सई रणवरे व श्वेता गाडेकर या दोन विद्यार्थिनींची निवड झाली त्यांना ४.५२ लक्ष एवढे वार्षिक वेतन मिळाले.विद्यापीठ टेबल टेनीस मेघा जगदाळे व कोमल शिंदे या दोन विद्यार्थिनींचे कॅपजेमिनी या कंपनीमध्ये निवड झालेली आहे त्यांना ३.८ लक्ष एवढे वार्षिक वेतन मिळाले. नेहा बनकर या विद्यार्थिनीचे पर्सिस्टंट या कंपनीमध्ये निवड झालेली असून तिला ४.५१ लक्ष वार्षिक वेतन मिळाले आहे. अंजनी पत्की हिचे हेक्सावेअर टेक्नॉलॉजीस, तेजस्वी कर्णे एमवेअर सॉफ्टवेअर सोल्युशन्स, सोनाली लोंढे वेबटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये निवड झाली आहे, त्यांना ३.२५ लक्ष एवढे वार्षिक वेतन मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांनी दिली.

      लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांची विविध नामवंत कंपन्यांमध्ये निवड झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना  उत्तम प्रकारे प्रशिक्षीत करण्यात आल्यानेच विद्यार्थ्यांना यश मिळाले.

      फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, सोसायटी नियामक मंडळाचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सोसायटी सर्व सदस्य, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments