सौ. शोभा राजेंद्र भागवत आदर्श माता पुरस्काराने सन्मानित
सौ. शोभा राजेंद्र भागवत यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करताना मान्यवर |
Shobha Rajendra Bhagwat honored with Adarsh Mata Award
फलटण -: जागतिक महिला दिनानिमित्त लायनेस क्लब ऑफ फलटण यांचे 'सन्मान तेजस्विनीचा' या कार्यक्रमांतर्गत गोखळी ता. फलटण येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शोभा राजेंद्र भागवत यांना "आदर्श माता" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रतिकुल परिस्थितीत आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले, त्यांना उत्तम संस्कार देऊन आदर्श कुटुंब घडविले त्याच बरोबर कोरोना संसर्ग साथीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षणासाठी त्यांना मदत केली. याबद्दल त्यांचा फलटण पंचायत समिती, गोखळी ग्रामपंचायत यांनी "कोरोना योध्दा” पुरस्काराने यथोचित गौरव केला आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल "आदर्श माता" पुरस्कार देऊन फलटण नगरपालिका बांधकाम सभापती श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांचे प्रमुख उपस्थितीत लायन बापूराव जगताप यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटी जनरल सेक्रेटरी श्रीमंत वसुंधराराजे नाईक निंबाळकर, लायनेस क्लब अध्यक्षा सौ निलम लोंढे पाटील, सौ. नेहा व्होरा, सौ. सुनंदा भोसले, रिजन चेअरमन ला. बाळासाहेब भोंगळे, डिस्ट्रिक चेअरमन मंगेश दोशी, नगरसेविका सौ. वैशाली चोरमले, भोजराज नाईक निंबाळकर, डॉ. अशोक व्होरा, मनुभाई पटेल, रणजित बर्गे, ह.भ.प. एस. एम.घाडगे, डॉ सौ. सजीवनी संजय राऊत, डॉ. सौ. दिपा प्रवीण आगवणे, श्रीमती रुपाली महेश बोरावके, ह.भ.प. पुष्पाताई कदम, फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. लतिका अनपट, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. राजश्री शिंदे, सविता दोशी, राजीव निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वीरपत्नी, वीर माता, कोव्हिड योध्दा, आदर्श व्यवसायिका, आदर्श महिला वकील, आदर्श शिक्षिका, आदर्श माता आदी विविध क्षेत्रातील २५ महिलांना सन्मान पत्र, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सौ. हेमलता गुंजवटे यांनी सूत्रसंचालन केले.
No comments