कोरोना चाचणी केल्याशिवाय दुकाने उघडता येणार नाहीत ; व्यापार्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी- मुख्याधिकारी प्रसाद काटकर
फलटण - : शहरातील सर्व व्यापारी, उद्योजक, छोटे दुकानदार, हातगाडीवाले, भाजी विक्रेते, रिक्षा चालक वगैरे सर्व घटकांनी दि. १५ मार्च पर्यंत कोरोना चाचणी करुन घ्यावी, कोरोना चाचणी करुन घेणे बंधनकारक असुन चाचणी केल्याशिवाय दुकान उघडता येणार नाही. चाचणी न करता दुकान उघडल्यास अशा व्यवसायिकांविरुद्ध कायदेशीर रित्या दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे फलटण नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच फलटण शहर व तालुक्यामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण पुन्हा वाढू लागले असल्यामुळे काही प्रमाणामध्ये जिल्हाधिकारी सातारा यांनी बंधने लागू केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फलटण शहरातील व्यापारी, उद्योजक, छोटे व्यापारी, हातगाडीवले, रिक्षा चालक, हॉटेल व्यासायिक वगैरे घटकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शहरातील उपजिल्हा रुग्णालय व शंकर मार्केट येथे, शाळा क्रमांक १ येथील नगर परिषद दवाखान्यात मोफत कोरोना चाचणीची व्यवस्था करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत या सुविधेचा लाभ घेऊन आपण व आपले कुटुंबीय आणि शहरवासीय नागरिकांचे आरोग्य अबाधीत ठेवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले आहे.
No comments