धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई - : धनगर समाजाला आरक्षण देण्यासह शासन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर आखलेल्या 13 विकास योजनांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितले. धनगर समाजाच्या विकासासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सदस्य शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
सन 2020-21 या कालावधीत धनगर समाजाच्या विकासासाठी तरतूद करण्यात आलेला 51 कोटी रुपये निधी कोविडचे निर्बंध असताना देखील काही प्रमाणात वितरित करण्यात आलेला असून, येत्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री भाई जगताप, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, कपिल पाटील, गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.
No comments