Breaking News

वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस देण्याचा वेग वाढवावा आणि व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून दुकानात बसावे पालकमंत्र्यांनी केल्या सूचना

Suggestions by the Guardian Minister to speed up vaccination to prevent the growing corona infection

        सातारा दि.18 (जिमाका): जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व्यापारी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते यांना टेस्ट करून घेवूनच दुकानात बसावे,  अशा टेस्ट करण्यासाठी प्रशासनाकडून मिशन मोडवर काम केले जावे तसेच लस देण्याचा वेग वाढवावा अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केल्या.

        जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

मोबाईलवर मिळणार रिपोर्ट :-

        या पुढे कोरोना टेस्ट केल्यानंतर स्व. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयाकडून टेस्टचा रिपोर्ट मोबाईलवर एसएमएस च्या माध्यमातून लिंक मिळेल ती लिंक क्लिक केल्या नंतर रिपोर्ट प्राप्त होणार आहे अशी यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे आर टी पी सी आर केल्यानंतर लागणारा विलंब आता संपणार असून घर बसल्या सुविधा प्राप्त होणार आहे. त्यामुळे फार काळ ताटकळत बसण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे जवळचे कोणी पॉझिटिव्ह आले तर उशीर न करता तुमचीही चाचणी करून घ्या असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा दर 16.21 असून बरे होण्याचा दर 93.96 इतका आहे तर मृत्युचा दर 3.67 इतका आहे.अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

कोरोना प्रतिबंधक लशीला वाढती मागणी

 कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आता लोक पुढे येत आहेत. हा वाढता प्रतिसाद पाहून जिल्ह्याने लसीची मोठ्या प्रमाणात मागणी  राज्य शासनाकडे नोंदविली आहे. कोरोना संसर्ग रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कमीत कमी 20 जणांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ग्रामीण भागात या कामासाठी ग्राम दक्षता समितीने आणि शहरातील स्थानिक समित्यांनी प्रशासनाला मदत करावी असे आवानही पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत केले.

No comments