Breaking News

रॉंग साईडला जात स्वीफ्ट ची मोटारसायकलला धडक ; एक ठार

Swift four-wheeler going to the wrong side hit the motorcycle

        गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - फलटण - पुसेगाव रोडवर वाखरी पाटी येथे स्विफ्ट या चारचाकी वाहनाने रॉंग साईडला जाऊन समोरून येणाऱ्या मोटारसायकलला  जोरदार धडक दिल्याने, झालेल्या अपघातामध्ये  दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला आहे.

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 16 मार्च 2021 रोजी 7.00 वा.चे सुमारास वाखरी ता. फलटण गावचे हद्यीत वाखरी पाटी जवळ, फलटण ते पुसेगाव जाणाऱ्या रोडवर  मेघनाथ विलास तांबे रा.ढवळ ता.फलटण हे स्वतःच्या  स्वीफ्ट व्हीडीआय क्र.MH 11 BV8277 या चारचाकी वाहनाने, पुसेगाव बाजुकडुन फलटण बाजुकडे गाडी चालवित घेवून जात असताना, हयगयीने, अविचाराने, रस्त्याचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने गाडी चालवुन राँगसाईडला येवुन, समोरुन फलटण बाजूकडुन पुसेगाव बाजुकडे जाणारे  रोहीदास धनाजी लोखंडे यांच्या पॅशन  प्रो मोटारसायकल क्र. MH-11BJ 7674 या दुचाकीस समोरुन ठोकर दिल्याने, झालेल्या अपघातामध्ये  रोहीदास धनाजी लोखंडे वय 55 वर्षे धंदा हमाली रा.ढवळ ता.फलटण जि.सातारा यांना गंभीर दुखापत होवून, त्यांचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद मयत व्यक्तीचा पुतण्या तुषार सुरेश लोखंडे यांनी दिली आहे.  अधिक तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.

No comments