Breaking News

तरडगाव व परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत

Tardgaon and area declared as containment zone

        गंधवार्ता वृत्तसेवा, तरडगाव दि.१७ (संजय किकले) - तरडगाव व वाड्या वस्त्यांवर कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  असल्याने उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी तरडगाव व परिसर कंटेनमेंट झोन घोषीत केला आहे. दरम्यान आरोग्य खात्यामार्फत सर्वेक्षण व उपचार, तसेच लसीकरण सुरु असल्याची माहिती तरडगाव प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांनी दिली आहे.

         तरडगाव येथे आतापर्यंत ८७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून त्यापैकी २ फलटण, १३ जम्बो रुग्णालय सातारा, १ पुणे, ९ खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून ६२ रुग्ण होम क्वारंटाइन असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले आहे.

No comments