Breaking News

फलटण शहर व तालुक्यात आजचा बंद यशस्वी

फलटण बंद प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  आमदार दीपक चव्हाण, सुभाषराव शिंदे, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, डी.के.पवार, उपनगराध्यक्ष नरेंद्र नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे व इतर

      Today's closure was successful in Phaltan city and taluka
        गंधवार्ता वृत्तसेवा फलटण- दि. २६ : किसन मोर्चा तर्फे पुकारण्यात आलेल्या  आजच्या भारत बंदला फलटण शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सक्रिय सहभाग घेतल्यामुळे फलटण शहरात बंद १००% यशस्वी झाला. ग्रामीण भागातही त्या त्या गावातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर रस्ता रोको करुन काही काळ वाहतूक बंद केली होती.
फलटण - रविवार पेठ मार्केट येथील बंद असणारी दुकाने 

शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली त्याप्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  आमदार दीपक चव्हाण, सुभाषराव शिंदे,व इतर
        आज सकाळी आ. दिपकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख मारंगावरून दुचाकी रॅली काढण्यात आली होती.  याप्रसंगी महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, सुधीर अहिवळे, सनी अहिवळे, राहुल निंबाळकर, प्रा. भीमदेव बुरुंगले, प्रशांत अहिवळे, रणजित निंबाळकर, विशाल पवार, श्रीरामचे संचालक महादेव माने यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
फलटण - रविवार पेठ मार्केट येथील बंद असणारी दुकाने 
शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली त्याप्रसंगी  श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर व इतर
        सर्व नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हातात राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याना पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

        भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक येथे रॅली पोहोचल्यानंतर आ. दिपकराव चव्हाण यांनी आजच्या बंद मध्ये सहभागी झालेले व्यापारी, उद्योजक, हातगाडीवाले, छोटे व्यवसाईक, हॉटेल व्यवसाईक, भाजीपाला फळे विक्रेते वगैरे शहरातील सर्व घटकांनी उत्स्फुर्त सहभागी होऊन बंद यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले.
फलटण - रविवार पेठ मार्केट येथील बंद असणारी दुकाने 

आदर्की फाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले

No comments