Breaking News

शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून मुंजवडी येथील दोघांना कोयत्याने व दंडक्याने मारहाण

The two were beaten with a scythe and a stick during a dispute over a road leading to the field

        गंधवार्ता वृत्तसेवा,फलटण - शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून मुंजवडी येथील दोघांना कोयत्याने व दंडक्याने मारहाण करुन जखमी केल्यावरुन मुंजवडी ता. फलटण येथील चौघांविरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

        याबाबत बाळासाहेब जिजाबा निंबाळकर वय ६६ रा. मुंजवडी यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार दि. १७ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास निंबाळकर यांच्या घरासमोर त्यांना व त्यांचा मुलगा नितिन बाळासो निंबाळकर यास शेतात जाण्याचा रस्ता का अडविला असे म्हणत अमोल बन्यासो निंबाळकर, बन्यासो जिजाबा निंबाळकर, तुळशीराम किसन निंबाळकर, किसन जिजाबा निंबाळकर सर्व रा. मुंजवडी यांनी कोयता, दगड व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी वरील चौघांविरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार सुर्यवंशी करीत आहेत.

No comments