Breaking News

मतदार यादीत नाव आहे परंतु फोटो नाही अशा मतदारांनी फोटो व नमुना 8 भरुन द्यावे

Voters who have a name in the voter list but no photo should fill in the photo and Form 8

         सातारा   (जिमाका): मतदार याद्या निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे नाव आहे परंतु फोटो नाही, अशा सर्व मतदारांनी   स्वत:चे फोटो व नमुना 8 भरुन आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत जमा करावे अन्यथा आपले नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे  मतदार नोंदणी अधिकारी 262 सातारा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे.

                मतदारांनी तात्काळ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत छायाचित्रे देण्याची कार्यवाही करावी अन्यथा नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल. याबाबत केलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही. फोटो नसलेल्या मतदारांची यादी राष्ट्रीय केंद्र (NIC) यांच्या www.nic.satara.in या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे, असेही उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे.

No comments