घराच्या वाटपावरून मारहाण ; महिलेस जबरदस्तीने विषारी औषध पाजले; महिला गंभीर
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - घराच्या वाटपाच्या कारणावरून सोमवार पेठ फलटण येथील चार जणांनी महिला, मुलगा व मुलीस काठीच्या साहाय्याने मारहाण केली, तसेच महिलेचे हात धरून जबरदस्तीने तिला विषारी औषध पाजले. यामध्ये महिला गंभीर जखमी असून, मुलगा - मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनला चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणात परस्परविरोधी तक्रारी झाल्या असून विरोधी पक्षानेही फिर्यादीच्या नातेवाईकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 21 मार्च 2021 रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास सोमवार पेठ, फलटण येथे ताया शाम पवार यांच्या राहते घरासमोर घराचे वाटणीचे कारणावरून शिवाजी कंट्याप्पा पवार, रुपेश शाम पवार, शांताबाई शिवाजी पवार, यल्लूबाई कंट्याप्पा पवार, सर्व राहणार सोमवार पेठ फलटण यांनी आपापसात संगणमत करून, घराच्या वाटपाचे कारणावरून उमेश शाम पवार, कोमल शाम पवार व ताया शाम पवार यांना काठीने व हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर शिवाजी पवार याने बीएससी पावडर विषारी औषधाने जीव जाऊ शकतो हे माहीत असताना देखील रुपेश पवार, शांताबाई पवार, यल्लूबाई पवार यांनी ताया पवार हिस धरून शिवाजी पवार याने ते विषारी औषध पाण्यात खलून ताया पवार हीस पाजले आहे. यामध्ये पाया पवार हे गंभीर जखमी झाले असून उमेश पवार व कोमल पवार हे किरकोळ जखमी झाले असल्याची फिर्याद राजेंद्र मारुती जाधव वय 50 धंदा मजुरी राहणार सोमवार पेठ फलटण यांनी दिली आहे.
तपास पोलीस हवालदार रत्नसिंह सोनवलकर हे करीत आहे.
No comments