युवकावर धारदार कटरने वार ; जीवे मारण्याचा प्रयत्न
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 24 मार्च 2021 - शेजारी राहणाऱ्या युवकाने, दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून रविवार पेठ फलटण येथील एकाने त्या युवकाच्या मानेवर, दंडावर व पाठीवर धारदार कटरने वार करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 23 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी सुरज शैलेश कांबळे वय 20 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार सरकारी दवाखान्याचे पाठीमागे रविवार पेठ फलटण, मूळ राहणार आदर्की खुर्द तालुका फलटण, हा त्याच्या मावशी प्रियंका समवेत सरकारी दवाखान्याजवळ बारामती चौक फलटण येथील रोड वरून जात असताना, शेजारी राहणारा इसम नामे निखिल अशोक बोराटे राहणार रविवार पेठ फलटण याने, सूरज कांबळे यास दारू पिण्यास पैसे मागितले असता, त्यास पैसे दिले नाहीत म्हणून शिवीगाळ करून हाताने मारहाण करून त्याचे जवळील धारदार कटरने सूरज कांबळे याच्या डावे बाजूस मानेवर, डाव्या हाताच्या दंडावर व पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने कटर ने वार करून, सुरज कांबळे या युवकास गंभीर जखमी केले आहे तसेच युवकाची मावशी प्रियांका हिस शिवीगाळ करून मारहाण केली असल्याची तक्रार सुरज कांबळे यांनी दिली आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब हे करीत आहे.
No comments