3 दुकाने सील ; नो मास्क 47 ; सोशल डिस्टनसिंग 9 दुकाने : फलटण पोलिसांची कारवाई
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी फलटण शहरातील 3 दुकानांवर गुन्हा दाखल करून, दुकाने सील करण्यात आली आहेत. तर मास्कचा वापर न करता बाजारपेठेत फिरणाऱ्या 47 जणांवर आणि दुकानांमध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्या 9 दुकांदारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
फलटण शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत सोमवार दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी, मास्कचा वापर न करता बाजारपेठेत व इतरत्र फिरणाऱ्या 47 नागरिकांवर कारवाई करून त्यांना 9400 रुपये दंड आकारण्यात आला. आणि दुकानांमध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्या 9 दुकांदारांवर केसेस करून एकूण 15000 रुपये दंड केलेला आहे.
जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून 1) असिफ मोहिउद्दिन कोतवाल 2) अखिल युनुस कोतवाल 3) जुनेद रफिक बागवान यांच्यावर भा.द.वि.सं. कलम 188, 269 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 52(b) नुसार एकूण 3 गुन्हे दाखल करून ही दुकाने सील करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी. के. किंद्रे यांनी दिली.
No comments