भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती फलटण येथे कोरोना नियमांचे पालन करत डिजिटल स्वरुपात साजरी होणार
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या जमावबंदी व संचारबंदीचे पालन करत फलटणमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती डिजिटल स्वरुपात आणि शासनाने केलेल्या सूचनांचे व कोरोना नियमांचे पालन करूनच साजरी करण्यात येणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने जाहीर केले आहे.
दि. 11 एप्रिल महात्मा फुले जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येईल. दि. 13 एप्रिल रात्री 12 वाजता व दि. 14 एप्रिल सकाळी 10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लोकप्रतिनिधी व जयंती मंडळ यांच्या हस्ते अभिवादन करण्यात येईल. सायंकाळी 7 वाजता, सर्व नागरिकांनी घरातच थांबून, एकाच वेळी भीम अभिवादन व बुद्ध वंदना घ्यायची आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा तसेच विचारांचे चिंतन करायचे आहे. सायंकाळी देखील कोणीही घरातून बाहेर न पडता, आपापल्या घरात व घराबाहेर दिव्यांची रोषणाई व सजावट करून, बरोबर 7 वाजता भीम अभिवादन व बुद्ध वंदना घेऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने कळवले आहे.
तरी दिनांक 14 एप्रिल रोजी कोणीही घराबाहेर न पडता आपल्या घरातच थांबून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती फलटण येथे वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम घेऊन जयंती साजरी केली जाते परंतु गेल्या वर्षी आणि याहीवर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर डिजिटल जयंती साजरी करत आहोत. Covid 19 च्या पार्श्वभूमी जयंती जरी साध्या पद्धतीने करत असलो, तरी त्याच उत्साहात जोशात वेगवेगळ्या ऑनलाइन स्पर्धा व उपक्रम राबविण्यात आले आहेत, हे उपक्रम राबवत असताना सोशल डिस्टंसिंग आणि स्वच्छतेचे सर्व नियम व अटी तसेच सूचनांचे पालन करूनच आपण जयंती साजरी करणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने जाहीर केले.
No comments