Breaking News

रुपेश भागवत यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल विविध सामाजिक संस्थांकडून सत्कार

Rupesh Bhagwat felicitated by various social organizations for being selected as PSI
     फलटण ( प्रतिनिधी) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील अंगणवाडी कर्मचारी सौ.शोभा राजेंद्र भागवत यांचे चिरंजीव रूपेश राजेंद्र भागवत ने जिद्द, चिकाटीच्या जोरावर २०१९ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत घवघवीत यश मिळवून राज्यात ओबीसींच्या मध्ये १० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नुकतेच नाशिक पोलिस अकादमीतील तब्बल १५ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर मुंबई येथे पोस्टींग झाले आहे. या यशा बद्दल फलटण येथील जय ज्योती नागरी सहकारी पतसंस्था कार्यालयात" महामित्र"परिवाराच्या वतीने शहर आणि ग्रामीण भागातील विविध सामाजिक संस्थाच्या वतीने जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांचे सह विविध सामाजिक संघटनांचे वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

    रूपेश भागवत यांचे प्राथमिक शिक्षण गोखळी येथील जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शिक्षण हनुमान माध्यमिक विद्यालय गोखळी येथे उच्च शिक्षण बारामती येथील तुळजाराम चतुरचंद विद्यालयात अधिक दोन कोर्स नंतर बारामती येथील ढेकळे टुव्हिलर गॅरेज मध्ये एक वर्ष तद्नंतर पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ मध्ये पदवीत्तर शिक्षण घेत विद्यापिठ अंतर्गत जयकर लायब्ररी मध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यास करत पदवीधर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोन वेळा एका गुणाने संधी हुकली तरीही नाउमेद न होता, जिद्द चिकाटी हिम्मतीच्या जोरावर पुन्हा तिसऱ्यांदा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत२०१९ मध्ये चांगल्याप्रकारे गुणवत्ता प्राप्त करून पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली.नाशिक पोलिस अकादमीतील तब्बल पंधरा महिने  खडतर प्रशिक्षणानंतर मुंबई येथे पोस्टींग झाले.

    गोखळी येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार राजेंद्र भागवत यांचे व्दितीय चिरंजीव आहेत.थोरले चिरंजीव योगेश भागवत हे फलटण एस.टी.आगारामध्ये वाहक म्हणून तर तृतीय चिरंजीव निलेश हे पुणे पिंपरी-चिंचवड पोलिस काॅन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.

    सहा वर्षाची चिमुकली कु‌ स्वरा योगेश भागवत यांची कन्या असुन १२तासात ११३ किमी सायकलिंग  करुन विक्रम केला.एका मिनिटात शंभर पुशप्स काढले असा आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल रुपेश, निलेश,कु.स्वरा या तिघांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

    यावेळी जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव सर, कार्यक्रमाचे संयोजक महामित्रचे संपादक सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, कोळकी चे फलटण  शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद नेवसे सातारा जिल्हा माळी समाज महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब ननावरे माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, जाधववाडी चे माजी सरपंच मनीष जाधव,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक परशुराम फरांदे,कोळकी ग्रामपंचायतीचे सदस्य शिवाजी भुजबळ,दिलीप नाळे, विकास नाळे, संदीप नाळे,प्रा.सपतराव शिंदे, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष बापूराव काशिद,ऋषी आढाव, अखिल भारतीय माळी समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष अरविंद राऊत, अरविंद राऊत, सातारा जिल्हा शिक्षक समितीचे नेते उदयकुमार नाळे, आदर्श बहुजन शिक्षक संघ ( IBTA) महाराष्ट्र चे मारूती ढगे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य आदर्श बहुजन शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेश बोराटे यांनी केले.

No comments