Breaking News

लाईट बिल भरा असे संगितले म्हणून दोघांना मारहाण ; महिलेचा विनयभंग

Both of them were beaten up for telling them to pay the light bill

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण  -  विहिरीवर पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारीचे लाईट बिल भरा, असं म्हटल्याच्या कारणावरून,चौघांनी वाखरी येथील संतोष जाधव व योगेश जाधव यांना मारहाण करून  तिथे उपस्थित असणाऱ्या जाधव यांच्या पत्नीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले प्रकरणी दालवडी येथील तिघांवर व वाखरी येथील एकविरुद्ध  ग्रामिण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.31 मार्च 2021 रोजी सकाळी 08.30 वाजण्याच्या सुमारास, दालवडी हद्दीतील जमीन गट नं 113 येथे, 1) राजेंद्र आनंदराव जाधव रा. वाखरी ता. फलटण 2) दादा आनंदराव जाधव रा. दालवडी ता. फलटण 3) गणेश दादा जाधव 4) परशुराम राजेंद्र जाधव दोघे राहणार वाखरी  यांना संतोष नागु जाधव यांनी   दालवडी ता. फलटण गावचे हद्दीतील जमिन गट नं. 113 मधिल विहिरीवरिल पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारीचे लाईट बिल भरले नाही. तुम्ही लाईट बिल भरा असे  म्हटले असता,  वरील चौघांनी मिळून, फिर्यादी संतोष नागु  जाधव यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दादा आनंदराव जाधव  याने फिर्यादीचा भाऊ योगेश जाधव यास लोखंडी दाताळ मारुन जखमी केले. तसेच गणेश दादा जाधव याने फिर्यादीची पत्नी हिचा पदर हाताने ओढुन तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.  झालेल्या भांडणाचे झटापटीत महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र तोडून ऊसाचे पाचटीत टाकुन दिले असल्याची तक्रार संतोष नागु जाधव  मुळ रा.वाखरी ता.फलटण सध्या रा. स्वामी विवेकानंद नगर फलटण ता.फलटण यांनी दिली आहे. 

    अधिक तपास सहा. फौजदार एस.बी. राऊत करीत आहेत. 

No comments