Breaking News

विकेंड लॉक डाऊन मध्ये फिरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

Charges filed against three people who were traveling elsewhere in Weekend Lockdown

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 11 एप्रिल - विकेंड लॉक डाऊन मध्ये, जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाचे उल्लंघन करत, वैध कारणाशिवाय इतरत्र फिरत असणाऱ्या तिघांवर फलटण येथे आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

     फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास, फलटण शहर पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर अविनाश सुरेश सरतापे वय 31 राहणार शिवाजीनगर,फलटण, रोहित किसन बोरकर वय 23 राहणार झिरपवाडी, सिकंदर सय्यद पठाण वय 40 राहणार रविवार पेठ फलटण  हे त्यांचे ताब्यातील निळसर रंगाच्या access मोपेड मोटरसायकल वरून फिरत होते.  वीकेंड लॉक डाऊन मध्ये जिल्हाधिकारी सातारा यांचे आदेशाचा उल्लंघन करून, वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येऊन आदेशाचा भंग केला म्हणून वरील तिघांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

     अधिक तपास पोलीस हवलदार गार्डी हे करीत आहेत.

No comments