Breaking News

फलटणच्या आबासाहेब मंदिरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह

Corona positive in Abasaheb temple of Phaltan

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर भक्तांसाठी मंदिरे बंद ठेवले असताना, पुजारी व कर्मचाऱ्यांना पूजा-अर्चा करण्यास परवानगी दिली आहे, तथापि मंदिराच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांचा रहिवास असेल आणि तेथे भरपूर लोकवस्ती असेल अशा मंदिरांमध्ये जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि तो मंदिरातच राहत असेल तर काय? असा प्रश्न उद्भवतो, अशाच आशयाचे फलटण येथील मारवाड पेठ जवळ असलेल्या आबासाहेब मंदिराबाबत झालेले आहे.

        फलटण येथील आबासाहेब मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांचे वास्तव्य सध्या मंदिर परिसरातच आहे व त्यांच्यामुळे तिथे राहणाऱ्या इतर लोकांना व भाविकांना त्रास होण्याची शक्यता असल्याची तक्रार  उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे काही नागरिकांनी केली आहे.  सदर कोरोना बधिताची राहण्याची व्यवस्था त्यांच्या घरी अथवा इतरत्र करावी अशी मागणीही केली आहे.

No comments