Breaking News

धोकादायक! फलटण तालुक्यात 114 कोरोना पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू

Corona virus Phaltan updates :  2 died and 115 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 10 एप्रिल 2021  - जिल्हा प्रशासनाकडून आज 10 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 114 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 41 व्यक्ती तर ग्रामीण भागात 73 रुग्ण सापडले आहेत.  दुसऱ्या लाटेत आज प्रथमच 114 रुग्ण सापडले आहेत. व 2 बधिताचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब भयंकर असून चिंता वाढवणारी आहे.  नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. 

फलटण शहरात 41 कोरोना पॉझिटिव्ह

     यामध्ये  फलटण 5, रविवार पेठ 6, मंगळवार पेठ 6, बुधवार पेठ 6, मलठण 5, सोमवार पेठ 1,  कसबा पेठ 2, पृथ्वी चौक 1,   काळुबाई नगर 1, लक्ष्मीनगर 2 , संजीवराजे नगर 1, शंकर मार्केट 1, पुजारी कॉलनी 1, ब्राम्हण गल्ली 1, जिंती नाका 1, झिरपे गल्ली 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 73 कोरोना पॉझिटिव्ह 

     यामध्ये कोळकी 9, तरडगाव 5, पाडेगाव 5,   जाधववाडी 2, राजाळे 2,   आळजापूर 1, आदर्की 2, नांदल 1,  सासवड 2, सरडे 1, सांगवी 2, विडणी 3, नाईकबोमवाडी 1, ढवळेवाडी 1, बरड 2, निरगुडी 2, खडकी 5,   वाठार निंबाळकर 3,  वाखरी 1, ढवळ 2, निंभोरे 4, कोरगाव 1, अलगुडेवाडी 1, चव्हाणवाडी 3, हिंगणगाव 1, चौधरवाडी 1,  शेरेचीवाडी 1, काशिदवाडी 1, विंचूर्णी 1, फडतरवाडी 1, सावंतवाडी 2, खुंटे 1, दुधेबावी 1, ढवळवाडी आसू 1, तिरकवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

 2 बधिताचा मृत्यू

सोमवार पेठ ता. फलटण येथील 42 वर्षीय पुरुष, फलटण येथील 70 वर्षीय पुरुष या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments