सर्वाधिक! फलटण तालुक्यात 157 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 58, ग्रामीण 99 तर 2 मृत्यू
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 12 एप्रिल 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 12 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 157 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 58 व्यक्ती तर ग्रामीण भागात 99 रुग्ण सापडले आहेत. कोरोना संसर्गामध्ये आज प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले असून 2 बधितांचा मृत्यू देखील झाला आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
फलटण शहरात 58 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण 27 (फक्त फलटण असा पत्ता दिलेले), लक्ष्मीनगर 8, बुधवार पेठ 5, रविवार पेठ 8, मंगळवार पेठ 1, विद्यानगर 1,मलटण 3, सगुनामाता नगर 2, संजीवराजे नगर 1, कसबा पेठ 1, काळुबाईनगर 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.
ग्रामीण भागात 99 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये कोळकी 14, विडणी 7, सांगवी 5, मठाचीवाडी 1,बरड 3, साखरवाडी 3, मिर्ढे 2, काळज 2, पाडेगाव 2, अलगुडेवाडी 3, हणमंतवाडी 1, पिप्रंद 3, जिंती 4, राजाळे 1, निंभोरे 2,सस्तेवाडी 4, जाधववाडी 4, चव्हाणवाडी 3, निंबळक 2, वडजल 1, नांदल 1, फरांदवाडी 1, आदर्की 1, कुरवली खुर्द 1, दुधेबावी 3, तांबवे 1, निरगुडी 1, विचुर्णी 1, सोनवडी बु 1, वेळोशी 1, दालवडी 1, चौधरवाडी 1,ढवळेवाडी 1, गुणवरे 5, तरडगाव 1, मठाचीवाडी 6, ठाकुरकी 2, खामगाव 1, सोमंथळी 1, साठे 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
2 बधिताचा मृत्यू
बोडकेवाडी ता. फलटण येथील 59 वर्षीय पुरुष, तांबवे ता. कराड येथील 45 वर्षीय पुरुष या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
No comments