आदेशाचे पालन न केल्याने मलवडी येथील किराणा दुकानावर गुन्हा दाखल
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - तोंडाला मास्क न लावता, वेळेचे बंधन न पाळता, पोपट किरणा स्टोअर्स या किराणा मालाचे दुकान उघडून दुकानातील किराणा साहित्य विक्रीस बसलेल्या मलवडी ता. फलटण येथील दुकानदारावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०९ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ६.३० ते ७.०० चे वाजण्याच्या सुमारास मौजे मलवडी ता.फलटण गावचे हद्दीत पोपट किराणा स्टोअर्स या दुकानात कुष्णांत संपत तरड़े वय ३५ वर्षे रा. मलवडी ता. फलटण हा तोंडाला मास्क न लावता बेकायदा वेळेचे बंधन न पाळता, दुकानातील किराणा साहित्य विक्रीस बसलेला असताना मिळून आला व जिल्हादंडाधिकारी सो. यांनी दिलेल्या आदेशाने उल्लंघन करून, स्वतः मास्कचा वापर न करता मानवी जिवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून मिळून आल्याने कृष्णकांत तरडे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस नाईक टी. जे. काळेल करीत आहेत.
No comments