कोरोना केंद्राना फ्रीज ची कमतरता : श्रीमंत संजीवराजे यांनी घेतली दखल ; गोविंद'च्या माध्यमातून २१ आरोग्य उपकेंद्रांना दिले फ्रीज
Freeze given to 21 primary health sub-centers through Govind Milk & Milk Products
फलटण -: कोरोना वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या फलटण शहर व तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम प्रभावी रितीने राबविण्यात येत असताना तालुक्यातील ३५ पैकी केवळ १४ आरोग्य उप केंद्रात फ्रीज उपलब्ध असून उर्वरित २१ प्राथमिक आरोग्य उप केंद्रांसाठी फ्रीज आवश्यक असल्याचे निदर्शनास येताच, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी आपल्या गोविंद मिल्क & मिल्क प्रॉडक्टसच्या माध्यमातून तातडीने १६५ लिटर क्षमतेचे २१ फ्रीज उपलब्ध करुन दिल्याबद्दल पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) व गोविंद मिल्क & मिल्क प्रॉडक्टस व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.
लसीकरण मोहिम प्रभावी रितीने राबविताना सदर लस थंड जागेत ठेवण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत तालुक्यातील ३५ पैकी १४ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात फ्रीज आहेत, मात्र उर्वरित २१ प्राथमिक आरोग्य उप केंद्रासाठी तातडीने फ्रीज आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी तेथूनच गोविंद'च्या अधिकाऱ्यांना १६५ लिटर क्षमतेचे २१ फ्रीज पंचायत समिती कार्यालयात पोहोच करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या सूचनेनुसार गोविंद'चे जनरल मॅनेजर (लॉजिस्टिक) निरंजन व्होरा, अकौंटस मॅनेजर अमोल चावरे यांनी १६५ लिटर क्षमतेचे २१ फ्रीज (Haier Company) पंचायत समिती कार्यालयात पोहोच केले, सर्व फ्रीज तातडीने सर्व आरोग्य उपकेंद्रावर पाठविण्याच्या सूचना सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी आरोग्य विभागाला दिल्या. त्यावेळी उपसभापती सौ.रेखाताई खरात, गटविकास अधिकारी डॉ.सौ.अमिता गावडे व पंचायत समिती सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
बरड प्रा.केंद्रांतर्गत : जावली, पवारवाडी. बिबी प्रा.आरोग्य केंद्रांतर्गत : आदर्की बु., सासवड, तरडफ. गिरवी प्रा.आरोग्य केंद्रांतर्गत : सोनवडी खु., वाठार २ (फरांदवाडी). राजाळे प्रा.आरोग्य केंद्रांतर्गत : विडणी, मठाचीवाडी, अलगुडेवाडी, सोमंथळी, खुंटे. साखरवाडी प्रा.आरोग्य केंद्रांतर्गत : होळ, चौधरवाडी, जिंती, निंभोरे, फडतरवाडी. तरडगाव प्रा.आरोग्य केंद्रातंर्गत : पाडेगाव, तांबवे, सालपे, हिंगणगाव. या २१ प्रा.आरोग्य उपकेंद्रांना १६५ लिटर क्षमतेचे फ्रीज उपलब्ध करुन दिल्याचे गटविकास अधिकारी डॉ.सौ.अमिता गावडे-पवार यांनी सांगितले.
No comments