Breaking News

पाणी मोटारीचे लाईट बिल भरत नाही म्हणून पती - पत्नी व मुलास मारहाण

Husband and wife and child beaten for not paying light bill

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - विहिरीवरील पाणी उपसा करणारी मोटर चालु करण्याकरीता मोटरची चावी मागितली असता, दालवडी येथील सहा जणांनी, तुम्ही लाईट बिल भरत नाही म्हणुन तुम्हाला मोटरची चावी मिळणार नाही असे म्हणत पती, मुलगा व पत्नीस लथाबुक्यांनी मारहाण केली.  या प्रकरणी  सहा जणांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

     फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१/३/२०२१ रोजी सकाळी ०८.३० वाजण्याच्या सुमारास, वैशाली दादा जाधव वय ४० वर्षे व्यवसाय शेती रा.दालवडी ता.फलटण यांनी आपल्या गट नं 113 मधील  विहिरीवरील पाणी उपसा करणारी  मोटर चालु करण्याकरीता मोटरची चावी   १) संतोष नागु जाधव २) योगेश नागु जाधव ३) नागु जगन्नाथ जाधव ४) मयुर बण्याबा जाधव ५) सावित्रा नागु जाधव ६) निशिता संतोष जाधव सर्व रा.दालवडी ता.फलटण  यांना मागितली असता, तुम्ही लाईट बिल भरत नाही, म्हणुन तुम्हाला मोटरची चावी मिळणार नाही, असे म्हणुन मोटरच्या फ्युजा काढुन घेवुन, फिर्यादी वैशाली जाधव व त्यांचे पती दादा आनंदराव जाधव, मुलगा गणेश जाधव यांना खाली पाडुन लाथाबुक्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार वैशाली दादा जाधव यांनी दिली आहे.

     अधिक तपास पोलीस हवलदार आर. बी. लीमन हे करीत आहेत.

No comments