Breaking News

रुग्णांच्या औषधोपचारासाठी योग्य ते नियोजन करा, प्रशासन अलर्ट करा – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Plan for proper treatment of patients, alert the administration - Guardian Minister Balasaheb Patil

    सातारा (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या  दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाला अलर्ट करा, कोणतीही व्यक्ती औषोधोपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, त्यासाठी योग्य ते नियोजन करा अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

    विश्रामगृह सातारा येथे कोरोना संसर्गाबाबतचा आढावा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला त्यावेळी  ते बोलत होते.

    यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

    जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा झाला असून लसीकरणाची मोहिम गतीने राबवावी. तसेच रेमडीसीविर औषधाचा तुटवडा भासणार नाही याचेही नियोजन करावे. तसेच कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या पाहता कोरोना रुग्णालयामध्ये बेडची क्षमता वाढवावी. याबरोबरच अधिकच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशाही सूचना श्री. पाटील यांनी  बैठकीत दिल्या.

No comments