श्रीमंत रामराजे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय ; आपल्या शुभेच्छा हीच माझी ताकद; काळजी घ्या,नियम पाळा - श्रीमंत रामराजे
Shrimant Ramraje decided not to celebrate his birthday on the backdrop of Corona
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि.7 एप्रिल 2021 - कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी, त्यांचा गुडीपाडव्याला असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून आपल्या शुभेच्छा हीच माझी ताकद असल्याचे सांगतानाच नागरिकांनी कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळावे व स्वतःची तसेच आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी, आपल्या व्हॉट्सऍप स्टेटस द्वारे जनतेला, आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचा संदेश दिला आहे. या संदेशात त्यानी म्हटले आहे की, कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेच्या मुळे मी वाढदिवस साजरा करणार नाही. आपल्या शुभेच्छा हीच माझी ताकद. काळजी घ्या. नियम पाळा.वाढदिवस 8 एप्रिल तारखे प्रमाणे आहे. तिथी प्रमाणे 13 एप्रिल. वाढदिवस साजरा होणार नाही.
No comments