वीकेंड लॉकडाऊनचे फलटणच्या नागरिकांकडून काटेकोर पालन
फलटण वीकेंड लॉकडाऊन - रविवार पेठ मार्केट (छाया - गंधवार्ता फलटण) |
Strict observance of Weekend Lockdown by the citizens of Phaltan
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि 10 एप्रिल 2021 - वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून वीकेंड लॉकडाऊनचे आदेश पारित करण्यात आले होते. यासंदर्भात सातारा जिल्हा प्रशासन, फलटण तालुका प्रशासन, फलटण नगर परिषद, पोलिस प्रशासन व राजकीय नेते यांनी नागरिकांना व दुकानदार व्यापारी विक्रेत्यांना लॉक डाऊनचे पालन करण्यासंदर्भात आवाहन केले होते त्यानुसार आज शनिवारी फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांकडून सर्व व्यवहार, दुकाने, व्यापार बंद ठेऊन लॉक डाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
फलटण वीकेंड लॉकडाऊन - अशोकराव भोईटे चौक ( डेक्कन चौक) (छाया - गंधवार्ता फलटण) |
फलटण शहरात शासनाने दिलेल्या नियमानुसार लॉक डाऊन केले गेले. हॉस्पिटल व मेडिकल वगळता इतर आवश्यक सेवा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरात व ग्रामीण भागात देखील रस्त्यावर, बाजार, मार्केटमध्ये शुकशुकाट पसरला होता. दरम्यान फलटण शहर व तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब चिंता वाढवणारी आहे. नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
फलटण वीकेंड लॉकडाऊन - महात्मा फुले चौक (छाया - गंधवार्ता फलटण) |
फलटण वीकेंड लॉकडाऊन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (छाया - गंधवार्ता फलटण) |
फलटण वीकेंड लॉकडाऊन - महावीर स्तंभ परिसर (छाया - गंधवार्ता फलटण) |
फलटण वीकेंड लॉकडाऊन - महात्मा फुले चौक (छाया - गंधवार्ता फलटण) |
No comments