श्रीमंत रामराजे यांच्या सूचनेनुसार फलटण उपजिल्हा रुग्णालयास 10 ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीन
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि.7 मे 2021 - महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार, फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयास 10 ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीन दिल्या असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना कळवले आहे.
कोविड १९ ची रुग्ण संख्या राज्यात वाढत आहे. त्याच प्रमाणात ऑक्सिजनची मागणी ही वाढली आहे. ऑक्सिजनसाठी पर्याय म्हणून ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचा वापर केला जातो. ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय संस्थाना मदतीचे आवाहन केले होते. सदर आवाहनास प्रतिसाद देत टेमासेक फौंडेशन, सिंगापूर यांनी तातडीने मदत करून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत. सदर ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे वाटप राज्यातील विविध भागात करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार, उपलब्ध झालेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर पैकी काही ऑक्सिजन कॉन्सट्रेटर (एकूण १०) सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण रुग्णालय, फलटण, जि. सातारा रुग्णालयासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडे सुपूर्द करण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना कळवले आहे.
No comments