तीन पानी जुगार खेळणाऱ्या 12 जणांना अटक; 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण 3 मे 2021 - जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उलंघन करुन, स्वतः मास्काचा वापर न करता हयगीयने बेदरकारपणे मानवी जिवित व व्यक्तीगत सुरक्षा धोकयात येईल असे कृत्य करुन, एकत्र येवुन तिन पानी पत्याचा जुगार खेळताना निंभोरे ता. फलटण येथे 12 जण मिळुन आले. फलटण ग्रामीण पोलिसांनी यांच्यावर कारवाई करून संबधीत 12 जणांवर गुन्हा दाखल करत सर्वांना अटक केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, १) बबन जगन्नाथ मानकर रा. ल्हासुर्णे ता. इंदापुर २) दयानंद किसन गाडे रा. शिवताकरवाडी ता. पुरंदर ३) ओकार अरुण तपासे राम्हल्हार पेठ सातारा ४) किरण एकनाथ गाडे रा. कापूरहोळ ता. भोर ५) समीर जमशेद मुलाणी रा. पिंप्रद ता. फलटण ६) गजानन महादेव डोंबाळे रा.डोंबाळवाडी ता. फलटण ७) राजेश शेवंतीलाल शहा रा. निंभोरे ता. फलटण, ८) अनिल अंकुश यादव रा.तरवडी लोणी काळभोर ता. हवेली ९) महेश जगताप रा. मंगळवार पेठ फलटण १०) चंदन काकडे रा. फलटण ११) शरद बाळु खवळे रा. निंभोरे ता. फलटण १२) रितेश रामस्वरूप नंदा रा. हडपसर पुणे हे सर्वजण दिनांक 2 मे 2021 रोजी सांयकाळी 5.00 वा चे सुमारास, निंभोरे ता. फलटण येथे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उलंघन करुन, स्वतः मास्कचा वापर न करता, हयगीयने बेदरकारपणे मानवी जिवित व व्यक्तीगत सुरक्षा धोकयात येईल असे कृत्य करुन, संसर्ग पसरविण्याचे घातक कृत्य करुन एकत्र येवुन, पत्याचे पानावर पैजेवर पैसे लावुन, तिन पानी पत्याचा जुगार खेळताना मिळुन आले. फलटण ग्रामीण पोलिसांनी यांच्यावर कारवाई करून संबधीत 12 जणांवर गुन्हा दाखल करत सर्वांना अटक केली आहे. यावेळी जुगाराचे साहित्य, पत्याची पाने, रोख रक्कम व चारचाकी २ वाहने असा एकुण १२,०८, १५०/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची कारवाई सातारा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस उपअधिक्षक सातारा श्रीमती अचल दलाल, ग्रामीण सपोनि बोंबले, पोऊनि शेख, सहा. पो. फौजदार यादव, पोकों, अभिजीत काशिद, सचीन पाटोळे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन वैभव शिंदे, शुभम चव्हाण, विशाल कोरडे, निलजेश जांभळे, उज्वल कदम, अनिकेत दिक्षीत यांनी केली आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
No comments