पिस्टल बाळगल्या प्रकरणी फलटणच्या 3 जणांना अटक
आरोपींसह पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ व पोलिस कर्मचारी |
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. २१ मे २०२१ - विनापरवाना पिस्टल बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सापळा रचून, फलटण मधील तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून पिस्टल सह एक जिवंत काडतूस, मोटारसायकल, तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० मे २०२१ रोजी मध्यरात्री पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राजू राम बोके हा त्याच्या दोन साथीदारांसह एका मित्राला मोटार सायकल वरून भेटण्या करीता येणार असून, राजू राम बोके हा बेकादेशीर पिस्टल (अग्नीशस्त्र) कब्जात बाळगत आहे. त्यानुसार तात्काळ दोन पंचाना बोलावून घेवून, त्यांच्यासह भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर, एस.के. राऊळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. अमोल कदम पोलीस उपनिरीक्षक, एस.एन. भोईटे सहाय्यक फौजदार, व्ही.पी. ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल, एस.डी.सुळ पोलीस नाईक, एस.ए. तांबे पोलिस नाईक, एन.डी. चतुरे पोलिस नाईक, व्ही. एच. लावंड पोलीस नाईक, ए.एस.जगताप पोलीस शिपाई, डि पी सांडगे पो.कॉ. असे सर्वजण पोलीस स्टेशन कडील शासकीय जीपने, मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सापळा लावून थांबले असताना, मध्यरात्री ००.४५ वाजण्याच्या सुमारास एका मोटार सायकल वर तीन इसम बातमीतील वर्णना प्रमाणे, येताना दिसले त्यांना जागीच पकडून, पो.नि. भारत किंद्रे यांनी त्यांची नावे विचारली असता १. त्यांनी त्यांची नावे राजू राम बोके वय ३४ रा. मंगळवार पेठ फलटण २. दिलीप तुकाराम खुडे वय ३२ वर्षे रा. लक्ष्मीनगर फलटण ३. मनोज राजेंद्र हिप्परकर वय २७ वर्षे रा. प्रेमलाताई हायस्कुल जवळ मलटण असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता, राजू राम बोके याच्या कमरेस एक पिस्टल खोवलेली दिसून आली. त्याची मॅगझीन काढून पाहीली असता त्यामध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच परवाना नसल्या बाबत त्याने सांगितले. लागलीच त्यास ताब्यात घेवून त्यांचे कडील पिस्टल (अग्नीशस्त्र), मोटार सायकल, तीन मोबाईल, तपास कामी जप्त करण्यात आलेले आहेत.
जप्त करण्यात आलेले पिस्टल, एक जिवंत काडतूस, तीन मोबाईल व मोटर सायकल चावी |
त्याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २२४/२०२१ भारतीय हत्यार अधिनियम ३,२५ भादवि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री एन. आर. गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत. आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक २४ मे २०२१ रोजी पर्यंत ५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे.
सदर कारवाई श्री. अजय कुमार बंसल पोलीस अधिक्षक सातारा, श्री. धिरज पाटील अपर पोलीस अधिक्षक सातारा, श्री.तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर, श्री. एस. के. राऊळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. अमोल कदम पोलीस उपनिरीक्षक, एस.एन. भोईटे सहाय्यक फौजदार, व्ही.पी. ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल, एस. डी. सुळ पोलीस नाईक, एस.ए. तांबे पोलिस नाईक, एन.डी. चतुरे पोलिस नाईक, व्ही. एच. लावंड पोलीस नाईक, ए.एस.जगताप पोलीस शिपाई, डि पी सांडगे पो.कॉ. यांनी केलेली आहे.
No comments