अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल
फलटण :- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी व त्यास मदत केल्याप्रकरणी तीन युवकांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर 20 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते 21 नोव्हेंबर 20 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या घराच्या बाहेरील रस्त्यावर चारचाकी वाहनातून फलटणमधील सहारा लॉज येथे घेऊन सुयोग गायकवाड (रा . लक्ष्मीनगर फलटण) याचा मित्र प्रीतम चोरमले (रा . फरांदवाडी फलटण) याच्या मदतीने अल्पवयीन बलिकेच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध केले . त्यानंतर 3 डिसेंबर 20 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी महेश ननवरे (रा.खुंटे रोड , चौधरवाडी ता . फलटण) याने अल्पवयीन बलिकेला बोलावून घेत सुयोग गायकवाड यांचे सोबत जे केले ते माझ्यासोबत कर अन्यथा तुझ्या घरच्यांना सर्व काही सांगेन, अशी धमकी देत वडजल येथे एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले अशी तक्रार अल्पवयीन मुलीने 30 एप्रिल 2021 रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.
त्यानंतर या गुन्ह्यातील संशयित आरोपी सुयोग गायकवाड आणि संशयित आरोपी महेश ननवरे यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली असून एका आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिस उपनिरीक्षक घोंगडे याचा पुढील तपास करीत आहेत.
No comments