चिंताजनक! फलटण तालुक्यात 494 कोरोना पॉझिटिव्ह तर 5 मृत्यू ; जिल्ह्यात 2692 कोरोनाबाधित
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 19 - फलटण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, आज ती संख्या 494 वर पोहचली आहे. कडक निर्बंध लावल्यानंतरही कोरोना बधितांचा संख्या कमी होताना दिसत नाहीये. अद्यापही कोरोना बधितांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असून, ही बाब चिंताजनक आहे. नागरिकांना अजूनही दक्षता घ्यावी लागणार आहे. नागरीकांनी कंपल्सरी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2692 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 41 बाधितांचा मृत्यु झाला तर फलटण तालुक्यात 494 नागरिकांचे अहवाल कोरोना बधित आले असून 5 बधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 112 (6693), कराड 234 (19835), खंडाळा 122 (8664), खटाव 323 (12561), कोरेगांव 362 (12189),माण 221 (9556), महाबळेश्वर 43 (3807), पाटण 86 (5813), फलटण 494 (19277), सातारा 492 (31641), वाई 174(10406 ) व इतर 29 (870) असे आज अखेर एकूण 141312 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 3 (147), कराड 2 (576), खंडाळा 2 (115), खटाव 8 (352), कोरेगांव 4 (286), माण 1 (184), महाबळेश्वर 0 (41), पाटण 1 (143), फलटण 5 (238), सातारा 9 (933), वाई 6(279) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3294 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
No comments