Breaking News

झिरपवाडी रुग्णालय इमारत दुरुस्त करून कोरोनाग्रस्तानच्या उपचारासाठी वापरावी - बजरंग गावडे

    फलटण (प्रतिनिधी) - फलटण शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना,  वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी झिरपवाडी गिरवी रोड येथील  ग्रामीण रुग्णालयाची इमारत तातडीने दुरुस्ती करून  इमारत कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी त्वरित वापरण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपचे तालुकाध्य पै. बजरंग गावडे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला आहे.  या वेळी युवा नेते अभिजीत भैय्या निंबाळकर, भाजपचे शहराध्यक्ष अमोल सस्ते, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नानासो ईवरे, किसान मोर्चा शहराध्यक्ष नितीन वाघ, युवा मोर्चा उपाध्यक्ष सोमनाथ यजगर, कुरोवली गावचे  माजी सरपंच धनाजी गावडे, संदीप आढाव, राहुल गावडे यांच्यासह   कार्यकर्ते उपस्थित होते.

   कोरोनाची पहिली लाट सुरू झाली असताना ही विविध  संघटनांचे मार्फत सामाजिक कार्यकर्त्यांनी हे रुग्णालय चालू करण्यात यावे अशी मागणी करूनही  प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेता, हलगर्जीपणा करण्याचे काम केले. तसेच  सहा महिन्यापूर्वी मंत्रालयीन स्तरावरही  बैठक होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचा अद्याप तोडगा निघालेला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णाला  रुग्णसेवा कमी पडत आहेत.  प्रशासनाने तातडीने ग्रामीण रुग्णालय दुरुस्ती करून उपचार केंद्र चालू करायला हवे होते, मात्र गेली सात ते आठ महिने देखभाल दुरुस्ती आराखडे, अंदाजपत्रक करण्यात येत असल्याचे सांगून सदर इमारत दुर्लक्षित ठेवण्याचे काम प्रशासनाने केले असून अशी शंका व्यक्त होत आहे.  तिसरी लाट येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात असताना ‌ यासाठी रुग्णाला जीवघेण्या आजारातून तयारी करण्याची आवश्यकता आहे रुग्णालयाची इमारत वीस ते पंचवीस वर्ष दुर्लक्षित असल्याने अज्ञातांनी इमारतीचे दारे खिडक्या काढून नेले आहेत तरी प्रशासनाने ग्रामीण रुग्णालय ची दुरुस्ती दुरुस्ती करून उपचार केंद्र लवकरात लवकर सप्ताहात चालू करण्यात यावे अन्यथा उपोषण, रस्ता रोको, मोर्चा व आत्मदहन यासारखे आंदोलन करण्याचा इशाराही गावडे यांनी दिला आहे.

No comments