आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राबविण्यासाठी सेवा पुरवठादारास मुदतवाढ
मंत्रिमंडळ निर्णय
Cabinet decision - Extension of service provider to implement emergency medical care plan
मंत्रिमंडळ निर्णय : दि. 5 मे 2021 - महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा पुरवठादाराबरोबर केलेल्या करारास मुदतवाढ देण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
समितीच्या शिफारशीनुसार तसेच मा. राज्यपाल महोदयांनी दिलेल्या मान्यतेनुसार पुढील 5 वर्षाकरीता म्हणजेच दि.01.02.2019 ते दि.31.01.2024 पर्यत या कालावधीकरीता जुन्या सेवापुरवठादारास मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर सेवापुरवठादारास सन 2018-19 च्या दरसूचीनुसार ALS रुग्णवाहिकेकरीता रु.2,52,146/- दरमहा दर व BLS रुग्णवाहिकेकरीता रु.2,35,166/- च्या दरामध्ये दरवर्षी 8 टक्के दराने दि.31.01.2024 पर्यंत दरवाढ देण्यात येत आहे.
सदर मुदत संपण्यापूर्वी दि.01 फेब्रुवारी,2024 पासून पुढील कालावधीकरीता नवीन सेवा पुरवठादार निवडीबाबतची ई-निविदा प्रक्रिया दिनांक 31 जानेवारी, 2024 पूर्वी पूर्ण करुन नवीन सेवापुरवठादाराची निवड करण्यात येईल.
त्याचप्रमाणे सदर सेवापुरवठादारास दि.01.02.2019 ते 31.01.2024 या कालावधीकरीता समितीच्या शिफारशीमध्ये नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्तीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार विभागास राहतील.
No comments