Breaking News

चंद्रकांतदादा! तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत देखील निवडून आणता आलेली नाही - रुपाली चाकणकर

Chandrakantdada! You have not even been able to elect a Gram Panchayat in your village - Rupali Chakankar

    गंधवार्ता, वृत्तसेवा, दि. 3 मे 2021 - तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत देखील निवडून आणता आली नाही, कोल्हापूरचा महापौर देखील तुम्हाला तुमच्या विचारांचा बसवता आलेला नाही, कोल्हापूर मध्ये ज्यावेळी पूरपरिस्थिती होती, त्यावेळी आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपल्याला आपला मतदारसंघ सोडून, पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित असा मतदारसंघ निवडावा लागला असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.

    ना. छगनराव भुजबळ यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काल टीका केली होती, या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, छगन भुजबळ यांच्यावरील टीकेचा समाचार घेत, ट्विटरच्या माध्यमातून चंद्रकांत दादांना खडेबोल  सुनावले आहेत. 

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे की,  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोरोनामुळे अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवली आहे, परंतु आपल्याला याचं काही घेणं देणं नाही, म्हणून आपण सातत्याने, याला महागात पडेल, त्याला बघून घेऊ, याच्यावर गुन्हा दाखल करा, याला आत टाका, याच्यावर आपण पीएचडी करता करता, एमफील देखील करायला लागला आहात, पण आपल्याला एकच सांगायचे आहे की, तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत देखील निवडून आणता आली नाही, कोल्हापूरचा महापौर देखील तुम्हाला तुमच्या विचारांचा बसवता आलेला नाही, कोल्हापूर मध्ये ज्यावेळी पूरपरिस्थिती होती त्यावेळी आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपल्याला आपला मतदारसंघ सोडून, पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित असा मतदारसंघ निवडावा लागला, त्यामुळे याचा देखील आपण शांतपणे विचार करावा असे मला वाटते, त्याच बरोबर जलयुक्त शिवार घोटाळा, चिक्की घोटाळा,  मुंबई बँक घोटाळा असे अनेक घोटाळे आहेत की ज्यांची चौकशी अद्याप बाकी आहे, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी च्या पुढे कोरोना सारख्या दुष्ट चक्रावर काम करणे, लोकांना आरोग्य सुविधा देणे, कोरोना सारख्या महामारी च्या विरोधात लढाई लढणे हे फार महत्त्वाचे आहे, महाराष्ट्राचा पनागरिक हा महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र आम्हाला महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे आम्ही इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही. आपण ज्या पद्धतीने आदरणीय छगनराव भुजबळ यांच्यावर टीका केली आणि आपण ज्या पद्धतीने सांगत आहात की आपण जामिनावर आहात. परंतु आपण थोडसं मागे वळून पाहिलं तर आपल्याला दिसेल आपले अनेक नेते जामिनावर आहेत, आपल्या शिवाय बाकीच्या सर्वांची बोलती बंद होईल, कारण आपल्यातले सर्वच नेते जामिनावर बाहेर आहेत.

No comments