फलटण शहरासह तालुक्यातील 8 गावांमध्ये कंटेन्टमेंट झोन जाहीर
Containment zones declared in 8 villages of the Phaltan taluka including Phaltan city
फलटण - फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू असून, शहर व तालुक्यात कोरोनाबाधीतांची संख्या वाढत चाललेली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण फलटण शहर व फलटण तालुक्यातील 8 गावात दिनांक २ मे ते ८ मे 2021 पर्यत कंटेन्टमेंट झोन जाहीर करण्यात आला असून, फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी याबाबत कंटेनमेंट झोनचा आदेश जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी कळविले आहे की, रविवार दिनांक 2 मे 20021 ते 8 मे 2021 अखेर फलटण शहरातील वैद्यकीय व मेडिकल अस्थापना वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने फलटण शहरातील सर्व किराणा मालाची दुकाने, सर्व भाजीमंडई व फळ विक्रेत्यांची स्टॉल्स, शहरांमधील कारखाना व मार्केट यार्ड त्याचबरोबर शहरातील सर्व बँका बंद राहतील भाजीमंडई फळ विक्रेते यांची घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचीही फलटण शहरातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच विनाकारण शहरांमध्ये फिरणाऱ्या नागरिकांच्यावर योग्य ती पोलिस कारवाई करण्यात येईल असेही प्रसाद काटकर म्हणाले आहेत.
याचबरोबर फलटण तालुक्यातील कोळकी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, वाठार निं, तरडगांव, जाधववाडी या आठ गावातही वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता रविवार दिनांक २ ते ८ मे २०२१अखेर फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. या आठ गावातही वैद्यकीय व मेडिकल अस्थापना वगळता सर्व आस्थापना बंद राहतील यामध्ये प्रामुख्याने गावातील सर्व किराणा मालाची दुकाने, सर्व भाजीमंडई व फळ विक्रेत्यांची स्टॉल्स, सर्व बँका बंद राहतील भाजीमंडई फळ विक्रेते,दूध व किराणा यांची घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विनाकारण गावामध्ये फिरणाऱ्या नागरिकांच्यावर योग्य ती पोलिस कारवाई करण्यात येणार आहे.
फलटण शहर व वरील आठ गावे याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये वैद्यकिय कारणांव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती ये - जा करणार नाही व शासनाने जारी केलेल्या प्रतिबंधीत क्षेत्र मार्गदर्शक तत्वांचे पालन होईल याची खबरदारी घेणेबाबत व त्या ठिकाणी आवश्यक ते कर्मचारी नियुक्त करुन भेटनोंदवही ठेवणेचे निर्देश द्यावेत दररोज भेट देऊन आवश्यक कार्यवाही करणेची दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत
याचबरोबर मुख्याधिकारी , फलटण नगर परिषद व गट विकास अधिकारी, पंचायत समिती फलटण यांनी प्रतिबंधीत क्षेत्राचा परिसर चोहोबाजूंनी सिलबंद करुन त्या क्षेत्रामध्ये समाविष्ठ कुटंब व व्यक्ती यांना जीवनावश्यक वस्तु पुरवणेबाबत योग्य ते नियोजन करावे . त्यासाठी दररोज भेट देऊन आवश्यक कार्यवाही करणेची दक्षता घेण्याच्या तसेच तालुका आरोग्य अधिकारी पं.सं.फलटण यांना प्रतिबंधीत क्षेत्राच हद्दी निश्चीत करुन IDSP Surveillance and cluster containment plan मधील मार्गदर्शक तत्वांनुसार सर्वेक्षण करुन प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्तींमध्ये कोणती लक्षणे आहेत काय हे तपासावे व आवश्यकते नुसार वैद्यकीय सुविधांमध्ये स्थलांतरीत करावे . सदर क्षेत्रामध्ये योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा लेखी तपशील दररोज तहसिलदार यांचे मार्फत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
No comments