Breaking News

फलटण तालुक्यात 392 तर 3 बाधितांचा मृत्यू ; जिल्ह्यात 2292 कोरोनाबाधित तर 40 बाधितांचा मृत्यू

Corona virus Satara District updates :  40 died and 2292 corona positive

    सातारा दि. 6 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2292 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 40 बाधितांचा मृत्यु झाला  तर फलटण तालुक्यात 392 रुग्ण कोरोना बाधित सापडले असून आज फलटण तालुक्यात 3 बधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

      तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 92 (5527), कराड 279 (17285), खंडाळा  81 (7139), खटाव 312 (10035), कोरेगांव 127 (9743),माण 179 (7467), महाबळेश्वर 36 (3468), पाटण 144 (4827), फलटण 392 (15175), सातारा 483 (26393), वाई 147 (8731 ) व इतर 20 (627) असे आज अखेर  एकूण   116417  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

      तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2 (108), कराड 6 (475), खंडाळा 4 (92), खटाव 3 (281), कोरेगांव 4 (253), माण 1 (152), महाबळेश्वर 0 (34), पाटण 0 (123), फलटण 3 (197), सातारा 12 (805), वाई 5 (220) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2740 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

No comments