फलटण शहरात कोविड सेंटर मध्ये अवतरला मानसातला देव माणूस
फलटण (प्रतिनिधी) - फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल उत्कर्ष येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे दमदार खासदार यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या कै.लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर हे कोविड सेंटर सुरू केले आहे. फलटण तालुक्यातील दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत चालले आहेत, फलटण तालुक्यातील रुग्णांना कोठेही बेड उपलब्ध होत नाहीत व गेल्या काही दिवसांपूर्वी अॉक्सिजन बेड मिळत नसल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या तालुक्यातील व मतदार संघातील रुग्णाला ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी कोविड सेंटर सुरू केले, या कोविड सेंटर मध्ये फलटण नगरपरिषदेचे बंडखोर नगरसेवक अनुप शहा यांनी आपला ठिय्या चक्क कोविड सेंटर मध्येच ठोकला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फलटण नगरपरिषदचे बंडखोर नगरसेवक अनुप शहा हे स्वतः मधुमेह व हृदयविकार रुग्ण आहेत.मात्र स्वताच्या जिवाची व आपल्या कुटुंबातील लोकांची परवा न करता लोकांच्या मदतीला धावून जाणारा असा देवमाणूस अनुप शहा, असे शब्द चक्क लोकनेते कै. हिंदूराव नाईक निंबाळकर कोविड सेंटर मधील काही रुग्णांनी काढले. आमची दररोज देखभाल करणारा असा हा माणसातला देवमाणूस म्हणजे अनुप शहा असे रुग्णांनी सांगितले आहे.
कोव्हीड सेंटर मध्ये डॉ.मोहित म्हात्रे हे, आपणही समाजाचे काही देणं लागतो या उक्तीच्या अनुषंगाने लोकांना सेवा देत आहेत. मुंबई (डोंबिवली) येथून आलेले कै.लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कोविड सेंटर मध्ये लोकांवर उपचार करत आहेत. अनुप शहा यांना डॉ. म्हात्रे यांनी चांगली साथ मिळत आहे.
नगरसेवक अनुप शहा व डॉ.मोहित म्हात्रे हे आपल्या कडे असलेल्या कोविड बाधित रुग्णांना आपल्याला कोविड झाला आहे, परंतु आपण यावरती मात करायची आहे, असे सांगतात. रुग्णांना त्यांचे मनोबल वाढण्यासाठी दररोज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास १५ मिनिटे योगा,व त्यानंतर भजन व नंतर प्रवचन असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी, कोविड सेंटर मध्ये चालू केले आहेत.त्यामुळे रुग्णांचे मनोबल वाढले आहे.काल मंगळवार दिनांक १८ मे रोजी भजनासाठी पं.पू.पप्पूशामराजदादा जामोदेकर तर यांनी पं.पू.गोविंदराजदादा लांडगे यांना प्रवचणासाठी आमंत्रित केले होते.
No comments