नियोजन भवन इमारतीच्या बांधकाम अंदाजपत्रकास शासनाची मान्यता - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
Government approves construction budget of Niyojan Bhavan building - Guardian Minister Balasaheb Patil
सातारा (जिमाका): जिल्हा नियोजन समिती, जिल्हा सातारा करीता नियोजन भवन इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा नियोजन समिती, जिल्हा सातारा करीता नियोजन भवन इमारत बांधकामासाठी 12 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार 14 कोटी 94 लाख 41 हजार इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे, असेही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
No comments