Breaking News

के. बी. उद्योग समूहाने लॉकडाउन मध्ये केलेल्या मदतीमुळे तृतीयपंथी समाज सुखावला

तृतीयपंथी समाजाला मदत देताना के. बी. उद्योग समूहाचे पदाधिकारी 

Help to third gender community from KB Industries Group

    समाजातील प्रत्येक घटकास जगण्याचा जसा हक्क आहे,  तसाच अधिकार या तृतीयपंथी   समाजास देखील असल्याचे व   त्यासाठी गरज पडेल तेव्हा तेव्हा के.बी उद्योग समूहातून मदत केली जाईल असे सचिन यादव यांच्यातर्फे सांगण्यात आले.

    फलटण: लॉकडाउनच्या काळात सर्व उद्योग धंदे बंद असल्यामुळे सर्वांचेच हाल चालू आहेत, त्यातही बाजारामध्ये फिरून पोटापाण्याची व्यवस्था करणाऱ्या तृतीयपंथी समाजास खायचे देखील वांदे झाले आहेत. शहर, तालुक्यातील लोकांनाच रोजची अडचण चालू असताना, मागायचे तरी कोणाकडे, अश्या विवंचनेत असताना तृतीयपंथी समाज जास्तच अडचणीत सापडला होता. त्यावेळी तृतीयपंथी समाजातील एकास काही लोकांनी, के. बी. उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा श्री. सचिन यादव  यांच्याकडे मदत मागण्याचा सल्ला दिला, त्यावेळी शिस्तप्रिय असणाऱ्या  उदयोग समूहाच्या प्रमुखास अशी मदत मागायच्या कल्पनेनेच त्यांच्या पोटात गोळा आला.

    राहायला स्वतःचे घर नाही, मागून खाणे बंद .... या मुळे कसेबसे एक वेळचे जेवण मिळत होते, तृतीयपंथी म्हटले की बहुसंख्य लोक त्यांच्याकडे तिरस्काराणे पाहतात, त्यामुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागणूक नाही, कामाला कोणी ठेवत नाही, देवाने, निसर्गाने केलेल्या अन्याया नंतर मनुष्याकडून होणारा अत्याचार निमूटपणे सहन करीत हा समाज वाटचाल करीत आहे. 

    रेशन कार्ड नाही,आधारकार्ड नाही, रेशन नाही, किराणामाल नाही, अश्या परिस्तिथीत आत्महत्यांचे विचार मनामध्ये येऊ लागले होते. तरी देखील आता मरण आले आहेच तर शेवटचा प्रयत्न करावा म्हणून त्यांनी, हिम्मत करून सरळ कंपनी मध्ये जाऊन यादव साहेबांची भेट मागितली, त्यांनतर तिथल्या अधिकारी,कर्मचारी यांनी त्याबाबतची माहिती उद्योगसमूहाचे प्रमुख श्री सचिन यादव यांना दिली, त्यांची कहाणी ऐकून यादव साहेब यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन त्यांना पूर्ण मदतीची ग्वाही दिली.

    नुसते आश्वासन देऊन न थांबता सचिन यादव यांनी लगेचच अधिकारी वर्गास सांगून, त्यांना अन्न तसेच बहुउपयोगी वस्तूंचे किट देण्याची व्यवस्था केली. तसेच भविष्यात देखील मदत देण्याचे वचन दिले. यावेळी यादव साहेब व त्यांच्या कंपनी मधील अधिकारी वर्गाने देखील खूप सहानुभूतीने विचारपूस केली, त्यामुळे तृतीयपंथी समाजाच्या प्रतिनिधींचे डोळे पाणावले होते.

    सचिन यादव यांच्या रूपाने पृथ्वीतलावरील देव पहावयास मिळाला असल्याची भावना व्यक्त करून, के. बी. उद्योगसमूहातर्फे मिळालेले किट घेऊन तृतीयपंथी प्रतिनिधी मंडळ समाधानाने घरी मार्गस्थ झाले.

No comments