Breaking News

हनी ट्रॅप : १५ लाख ५० हजार रूपयांची खंडणी वसूल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Honey Trap: Filed a case against those who collected a ransom of Rs 15 lakh 50 thousand

   गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 24 मे 2021 -  फलटण येथील पीडित व्यक्तीस, भेंडी व्यापाऱ्यास भेटण्याच्या बहाण्याने, एका फ्लॅटमध्ये नेले. तिथे एक मुलगी व तीन जणांनी त्यास मारहाण केली, नंतर इतर दोघीजनांनी पीडित व्यक्तीस गिरवी रोड वरील ओढ्यात जबरदस्तीने नेऊन, तिथे सर्वजणांनी त्यास मारहाण केली, नंतर मुलीला तुझ्या विरुद्ध बलात्काराची तक्रार देण्यास सांगतो, अशी धमकी देऊन, 20 लाख रुपयांची मागणी करून, पीडित व्यक्तींकडून 15 लाख 50 हजार रुपये  आरोपींनी वसूल केले.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,  दिनांक १५ मे २०२० रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास, पिडीत फिर्यादी हे त्यांचे भाड्याचे गाळयात बसलेले असताना, अजीत घोलप रा. नागेश्वर नगर, चौधरवाडी याने मानस प्लाझा बिल्डींग लक्ष्मीनगर फलटण येथे भेंडीचे व्यापारी आलेले आहेत, ते भेंडी घेणार आहेत, असे सांगून त्यांचे स्कुटी मोटार सायकल वरून घेवून गेला. त्यावेळी तेथे एक मुलगी व १. राजू बोके २. मनोज हिप्परकर ३. रोहीत भंडलकर हे देखिल बसलेले होते त्यांनी, फिर्यादी यांना मारहाण करून त्यांचे कपडे काढून,  सदर मुलीचे अंगावर ढकलून देवून फोटो काढले व तेथून गिरवी जाणारे रोड वरील ओढयात अजित घोलप व विजय गिरी गोसावी यांनी जबरदस्तीने पिवळे रंगाचे मोपेड मोटार सायकल वर बसवून घेवून गेले.  तेथे राजू बोके, मनोज हिप्परकर, रोहीत भंडलकर हे देखिल त्यांचे मोपेड स्कुटी मोटार सायकल वरून तेथे आले व त्या सर्वांनी फिर्यादी यांना हाताने लाथाबुक्यांनी मारहाण, दमदाटी केली.  रोहीत भंडलकर याने फिर्यादी यांचे तोंडात लघवी केली. त्यावेळी बाकीचे लोकांनी त्यांना धरून ठेवले होते व म्हणाले कि, आत्ता पोलीस स्टेशनला घेवून जातो व त्या मुलीला तुझ्या विरुद्ध बलात्काराची तक्रार देण्यास सांगतो असे म्हणून व फिर्यादी यांचे विरूद्ध पोलीसांत तक्रार देण्याची भिती दाखवून दमदाटी करून २० लाख रूपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी इज्जत जाईल व बदनामी होईल या भितीने त्यांना १५ लाख ५० हजार रूपये दिलेले आहेत. 

    आज रोजी पिडीत फिर्यादी यांना पोलीसांनी सुरक्षिततेची ग्वाही दिल्याने, त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. त्याप्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर २२८/२०२१ भादविस कलम ३६४ (अ) ३८४, ३८६, ३८९, ३२३, ५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आलेला असून गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.

    सदर गुन्हयाचा तपास सातारा पोलीस अधीक्षक  अजय कुमार बंसल, अपार पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली श्री भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर, श्री. एस.के. राऊळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री.एस.ए.बनकर पोलीस उपनिरीक्षक, एस. एन. भोईटे सहाय्यक फौजदार, कही. पी. ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल, एस.डी.सुळ पोलीस नाईक, एस.ए.तांबे पोना, एन.डी. चतुरे पोलीस नाईक , व्ही. एच लावंड पोलीस नाईक, ए.एस. जगताप पोलीस शिपाई  यांनी केलेली आहे.

    तरी फलटण शहर पोलीस ठाणेचे वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, जर अशा प्रकारची घटना कोणा बरोबर घडली असल्यास त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. त्यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल.

No comments