Breaking News

काशिळ येथील कोविड रुग्णालयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Inauguration of Covid Hospital at Kashil by Guardian Minister Balasaheb Patil

    सातारा दि.3 (जिमाका): काशिळ येथे सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालय कराड व साताराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कराड व सातारा तसेच काशिळ परिसरातील नागरिकांना या रुग्णालयाचा लाभ होणार असून या रुग्णालयामार्फत कोविड रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत, असा विश्वास पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

    काशिळ येथील कोविड रुगणालयाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.

    या कोविड रुग्णालयात 32 आयसीयु बेड व 31 ऑक्सिजन बेड असे एकूण 63 बेड आहेत. यामधील सुरुवातीला 32 ऑक्सिजन बेड कार्यान्वीत करण्यात येणार असून काही दिवसानंतर आयसीयु बेड कार्यान्वीत करण्यात येणार आहे.  सातारा येथील जम्बो कोविड रुग्णालयातील आरोग्य  यंत्रणेमार्फत या कोविड रुग्णालयात आरोग्य सेवा दिल्या जाणार आहेत. या रग्णालयात कोविड रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळेल असा विश्वासही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

    काशिळ येथील कोविड रुग्णालय हे मोक्याच्या ठिकाणी असून काशिळ परिसरातील नागरिकांबरोबर कराड व सातारा तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळणार आहे. शासनाने हॉस्पीटल सुरु केले आहे. या रुग्णलयासाठी नियमित कर्मचारी द्यावेत. हे रुग्णालय सुरु केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाचे आभार मानले.

No comments