आमदार दीपक चव्हाण यांना कोरोना
फलटण : फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, सध्या त्यांची प्रकृती ठीक असून, संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
मागील अनेक दिवसांपासून आमदार दीपक चव्हाण कोरोना आढावा बैठकी घेत होते, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम याकडे लक्ष देऊन होते अनेक लसीकरण केंद्रावर भेट देत होते. नुकतीच त्यांना काही लक्षण जाणवल्याने कोरोना चाचणी केली असता, त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला. आमदार दीपक चव्हाण यांनी "मी घरीच होम क्वारंटाइन मध्ये उपचार घेत असून माझी प्रकृती उत्तम आहे . दरम्यान गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी , स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी", असे आवाहन केले आहे .
No comments