मराठा आरक्षण निकालाच्या पार्श्वभूमीवर फलटण - साखरवाडी येथे पोलिसांकडून संचलन
फलटण येथे संचलन करताना पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार |
Mobilization by police at Phaltan-Sakharwadi on the background of Maratha reservation result
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण -
आज दिनांक 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण संदर्भात स्थगिती देऊन निकाल जाहीर केला या पार्श्वभूमीवर फलटण शहर व तालुक्यात मध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून शहरातील प्रमुख मार्गावरून तसेच साखरवाडी येथे संचलन करण्यात आले. जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.तरी मराठा आरक्षण अनुषंगाने जाहीर झालेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले.
फलटण येथे संचलन करताना पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार |
मराठा आरक्षण मुद्द्यावरून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे कामी पोलीस अधीक्षक सातारा श्री अजय बन्सल यांचे मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी,फलटण शतानाजी बरडे यांचे नेतृत्वाखाली फलटण शहर पोलिस ठाणे हद्दीत आज दिनांक 5 मे 2021 रोजी सायंकाळी 5:00 ते 6:35 या वेळेत फलटण शहर पोलीस ठाणे, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, लोणंद पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीत्या प्रमुख मार्गावरून संचलन केले.
फलटण शहरात सदरचे संचलन (रूट मार्च) महात्मा फुले चौक - डेक्कन चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- उमाजी नाईक चौक - गजानन चौक ते महात्मा फुले चौक असे करण्यात आले. सदर रूट मार्च करता 9 अधिकारी,40 पोलीस अंमलदार 16 एस आर पी एफ चे अंमलदार 18 होमगार्ड उपस्थित होते .रूट मार्च करीता 3 फाईव्हटानी गाड्या,3 पोलिस जीप,2 पोलीस बिट मार्शल मोटर सायकली इत्यादी सह रूट मार्च काढण्यात आला आहे.
साखरवाडी येथे संचलन करताना पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार |
फलटण ग्रामीण पोलिसांकडून साखरवाडी येथे संचलन करण्यात आले. सदरचा रूट मार्च साखरवाडी एसटी स्टॅण्ड - बाजारपेठ - चांदणी चौक - एसटी स्टॅण्ड काढणेत आला. सदर रूट मार्च करता ७ अधिकारी, ३२ पोलीस अंमलदार 16 एस आर पी एफ चे अंमलदार 18 होमगार्ड उपस्थित होते .रूट मार्च करीता 3 फाईव्हटनी गाड्या,3 पोलिस जीप,इत्यादी सह रूट मार्च काढण्यात आला आहे.
साखरवाडी येथे संचलन करताना पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार |
फलटण येथे संचलन करताना पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार |
No comments