नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, फलटण व ग्रामीण व उपकेंद्र येथे आज लसीकरण नाही- शिवाजीराव जगताप
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 7 मे 2021 - मुधोजी हायस्कूल फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयामार्फत फलटण शहरातील नागरिकांसाठी लसीकरण करण्यात येत आहे. आज १८ ते ४४ वर्षे वयोगटातील फक्त कोवॅक्सीन लस उपलब्ध आहे. व यादीमध्ये नमूद २०० व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे. यादीमध्ये नाव नसलेल्या व्यक्तींनी केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे. तसेच ४५ व अधिक वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्याने दि. ७/५/२०२१ रोजी लसीकरण होणार नाही. ४५ वर्षे व अधिक वयोगट व कोवॅक्सीन चा दुसरा डोस असणाऱ्या व्यक्तींना दि. ७/५/२०२१ रोजी लसीकरण होणार नाही. त्याबाबत नंतर माहिती दिली जाईल. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, फलटण ( बाहुली शाळेजवळ) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपकेंद्र याठिकाणी आज दिनांक ०७/०५/२०२१ रोजी कोणतीही लस उपलब्ध नसल्याने लसीकरण पूर्ण बंद राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी जाहीर केले आहेत.
No comments