एक बाधित व्यक्ती, अख्ख कुटुंबंबाधित करतो आहे ; वेळेवर लक्षणे ओळखून रुग्णालयात जा पालकमंत्र्यांनी केले भावनिक आवाहन
सातारा (जिमाका):- कोरोनाचा संसर्गाची लक्षणे असूनही काही रुग्ण पुढे येऊन तपासणी करत नाही, एका व्यक्तीमुळे आख्खेच्या आख्खे कुटुंब बाधित होत आहे. ज्या कोणाला कोरोची लक्षणे आढळल्यास त्यांनी न घाबरता तात्काळ रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी, असे भावनिक आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
गुरसाळे ता. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी आमदार जयकुमार गोरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, शिवाजी सर्वगोड, पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम, संदीप मांडवे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकरी उपस्थित होते.
राज्य शासनाने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. राज्याचे अधिक बजेट हे आरोग्यावर खर्च करण्यात येत आहे. प्रत्येक कोरोना बाधित रुग्णाला उपचार मिळाले पाहिजे, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. कोरोना संसर्गाची पुढच्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अनुषंगाने राज्य शासन योग्य ते नियोजन करीत आहे. 31 मे पर्यंत राज्यासह जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. 1 जूनपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी न झाल्यास जून महिन्यातही जिल्ह्यात कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घ्यावा लागले, याला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जनतेने शासनाने घातलेले निर्बंध चांगल्या पद्धतीने पाळले, परंतु दुसऱ्या लाटेत निर्बंध पाळले जात नाहीत, यामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत आहे. तरी कोरोना संसर्गाची लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावून उपचार घ्यावेत.
No comments