फलटण शहर : आजची लसीकरण स्थिती
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 8 मे 2021 - ४५ व अधिक वर्षे वयोगट कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्याने दि. ८/५/२०२१ रोजी लसीकरण होणार नाही. ४५ वर्षे व अधिक वयोगट व कोवॅक्सीन चा दुसरा डोस असणाऱ्या व्यक्तींना दि. ८/५/२०२१ रोजी लसीकरण नाही. त्याबाबत नंतर माहिती दिली जाईल. तसेच मुधोजी हायस्कूल फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयामार्फत फलटण शहरातील नागरिकांसाठी लसीकरण करण्यात येत आहे. आज १८ ते ४४ वर्षे वयोगटातील फक्त कोवॅक्सीन लस उपलब्ध आहे. व यादीमध्ये नमूद २०० व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे. यादीमध्ये नाव नसलेल्या व्यक्तींनी केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, फलटण ( बाहुली शाळेजवळ) आज दिनांक ०८/०५/२०२१ रोजी कोणतीही लस उपलब्ध नसल्याने लसीकरण पूर्ण बंद राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी जाहीर केले आहे.
No comments