Breaking News

विनाकारण फिरणाऱ्यांवर फलटण पोलिसांची कारवाई ; वाहने 8 दिवसांकरिता ताब्यात

Phaltan police action against unruly wanderers

गंधवार्ता, वृत्तसेवा, दि. 2 मे 2021
    फलटण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे फलटण शहर हे दिनांक दोन मे 2021 ते आठ मे 2021 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर शहरात बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या वर फलटण शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली यामध्ये जवळपास 40 वाहनांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले. सदर वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून,  वाहने वाहन मालकांना आठ दिवसानंतर ताब्यात देण्यात येणार आहेत. 

     उपविभागीय अधिकारी श्री शिवाजीराव जगताप सो,फलटण यांनी दिनांक 2/5/2021 ते दिनांक 8/5/2021 रोजी पर्यंत फलटण शहर व शहराचे आसपासचा परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला आहे. या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाण्याचे वतीने आज दिनांक 2 मे 2021 रोजी शहर हद्दीमध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून, विनाकारण फिरणाऱ्या एकूण 40 वाहनांवर कारवाई केली आहे. डिटेन केलेली वाहने वाहन मालकांना आठ दिवसानंतर ताब्यात देण्यात येणार असल्याचे फलटण शहर पोलीस स्टेशन कडून कळविण्यात आले आहे.
     फलटण शहरामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही नागरिक विनाकारण फलटण शहरात  फिरणार नाही. विनाकारण केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई काढण्यात येईल असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments