विनाकारण फिरणाऱ्या 67 नागरिकांवर फलटण पोलिसांची कारवाई ; वाहने 8 दिवसांनी मिळणार
गंधवार्ता, वृत्तसेवा, फलटण दि. 4 मे 2021 - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने जिल्हाधिकारी सातारा यांनी सध्या स्थितीत लागू असलेले निर्बंध कडक केले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्यावर फलटण शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली, यामध्ये जवळपास 67 वाहनांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले. व त्यांची वाहने 8 दिवसांकरता ताब्यात घेण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने जिल्हाधिकारी सातारा यांनी सध्या स्थितीत लागू असलेले निर्बंध कडक केल्याने तसेच पोलीस अधीक्षक सो,सातारा यांनी दिले आदेशान्वये आज दिनांक 4 मे 2021 रोजी फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीतील प्रमुख चौकातून नाकाबंदी करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सो,फलटण श्री बरडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहरात विनाकारण दोन चाकी/चार चाकी वाहनांमध्ये फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी करून, जे विनाकारण फिरत होते त्यांची वाहने डिटेन करण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 67 वाहने तात्पुरत्या कालावधी करता डिटेन करण्यात आली आहेत. डिटेन केलेली वाहने वाहन मालकांना 8 दिवसांनी ताब्यात दिली जाणार आहेत.
सदर कारवाई करता फलटण शहर पोलीस ठाणे कडील 4 अधिकारी,30 पोलीस अंमलदार,15 होमगार्ड नेमण्यात आले होते. तरी फलटण शहर पोलीस ठाण्याचे वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोरना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विनाकारण कोणीही बाहेर पडू नये व प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
No comments