'त्याने' प्रेताचे लचके तोडले नाहीत....फळे खाल्ली - रवी बोडके, यशोधन ट्रस्ट
गंधवार्ता, वृत्तसेवा, दि. 5 मे 2021 - कोळकी, ता. फलटण येथील राव रामोशी पुलानजीक असलेल्या कोरोना मृतदेह अंत्यसंस्कार स्मशानभूमी मध्ये येथे 4-5 दिवसांपूर्वी, एका मनोरुग्णाने सरणावर जळत असलेल्या अर्धवट कोविडग्रस्त मृत्यूदेहाचे लचके तोडून आपली भूक शमविण्याचा प्रयत्न केला, असल्याचे प्रसारित झाले होते. परंतु प्रत्यक्षात त्या मनोरुग्णाने प्रेताचे लचके तोडले न्हवते, भूक शमवण्यासाठी प्रेताच्या जवळ असणारी फळे खाल्ली असल्याचे यशोधन ट्रस्टचे संचालक रवी बोडके यांनी दैनिक गंधवार्ता प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कोळकी, ता. फलटण येथील स्मशानभूमीत कोरोनाग्रस्तांच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडणाऱ्या मनोरुग्णाचे वाई तालुक्यातील यशोधन ट्रस्ट येथे पुनर्वसन करण्यात आले. प्रशासनाने यशोधन ट्रस्टचे संचालक रवि बोडके यांच्याशी संपर्क करत, त्या मनोरुग्णाला यशोधन ट्रस्टमध्ये घेण्याची विनंती केली. त्यांनतर त्या मनोरुग्णाला यशोधन वेळे येथे नेण्यात आले. त्या मनोरुग्णाची कोव्हीड टेस्ट केल्यानंतर यशोधन ट्रस्ट चे रवी बोडके यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्याला बोलतं केलं.
तो मनोरुग्ण व रवी बोडके यांच्यात झालेला संवाद पुढील प्रमाणे आहे.
काय रे काय नाव . . .
विरु . . . .
साहब भुख लगी है.खाना दाे ना . .
(त्याला जेवण देण्यात आले)
पुढं आलेलं जेवनाचं ताट १ मिनिंटात सपंवलं. त्याच्या चेहर्या वरती समाधान दिसलं.
अब बाेलाे क्या हुआ? क्यूँ खाया मांस
साहब कहा खाया मांस, 8 दिनसे भुखा हुँ.
ना काेई पाणी देता है ना काेई खाना. रास्ते से गुजर रहा था. समशान घाट दिखा, साेचा कुछ खाने काे मिलेगा. वहा गया ताे कुछ फल मिला वही मै खा रहा था.
साहब कसमसे मांस नही खाया मैने. भुखा था मै.
विरु हे बाेलुन, रुम मध्ये गेला .तेव्हा समजलं की ताे नरभक्षक नाही.
संचालक रवी बोडके यांनी पुढे सांगितले की, विरु हा मुळचा हैद्राबादचा आहे. थाेडा मनाेरुग्ण आहे, कदाचीच घरातुन भरकटला आहे. विरुची काेविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. लवकरच त्याच्यावर मानसोपचार तज्ञ यांच्या सहाय्याने उपचार सुरु करणार आहाेत.
रवी बोडके, संचालक यशोधन ट्रस्ट |
विरु ला फलटण हुन यशोधन मध्ये आणले ते, रात्रीचे 2 वाजले हाेते. त्यांनतर त्याला एका रुम मध्ये ठेवले. रात्रभर त्याच्या रुम बाहेर कडक पहारा दिला. सकाळी 10 वाजता परत निवारा केंद्रात आलाे. त्याचा RTPCR COVID TEST स्वॅब सरकारी दवाखान्यात दिला. निवारा केंद्रात आलाे, आता त्याला बाेलतं करायचं हाेतं, मग हळूहळू त्याच्याशी चर्चा करत, त्याच्याशी संवाद साधला. आणि त्यांने त्या रात्री नेमकं काय केलं ते जाणून घेतलं. त्याने कोणतीही हिंसक प्रतिक्रिया न देता, व्यवस्थित संभाषण केले व सांगितले की मी मांस खाल्ले नाही तर तिथं असणारी फळे खाल्ली होती, आता पुढे त्याच्यावर उपचार करून, त्याला घरी पोहोचवण्याचे काम करण्यात येणार असल्याचे यशोधन ट्रस्ट संचालक रवी बोडके यांनी दैनिक गंधवार्ता प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
No comments